प्रतिनिधी/ पणजी
विविध मागण्यांसाठी जीवरक्षक पर्यटन संचालकांना भेटण्याकरीता आले होते. सकाळी त्यांना बोलवण्यात आले परंतु संचालक नसल्याने ते सर्वजण बसून राहिले व सायंकाळपर्यंत बसून होते. सायंकाळी संचालक भेटणार म्हणून ते थांबले पण शेवटी त्यांची भेट झाली की नाही ते कळू शकले नाही.
जीवरक्षक संघटनेच्या नेत्या स्वाती केरकरही तेथे उपस्थित होत्या. त्यांनीही सकाळपासून संचालकांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. आता येणार, मग येणार व भेटणार म्हणून त्यांना सर्वांना निष्ठत ठेवण्यात आले.