नवी दिल्ली
भेल अर्थात भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड यांना नुकतेच एक कंत्राट मिळाले आहे. कंपनीला नाल्को अर्थात नॅशनल ऍल्युमिनीयम कंपनीकडून 450 कोटींच्या प्रकल्पाचे कंत्राट मिळाले आहे. सदरचा कंत्राट मिळालेला प्रकल्प हा ऊर्जा प्रकल्प असल्याचे समजते. नाल्कोचे ओडीशातील दमनजोडी येथे 5 ऍल्युमिनीयम प्रकल्प असून त्यांचा विस्तार कंपनी करणार असल्याचे समजते. भेल कंपनी डिझाइन, अभियांत्रिकी, निर्मिती, पुरवठा, उभारणी, चाचणी अशा क्षेत्रात निपूण आहे. भेलने नाल्कोला याआधी साहित्याचा पुरवठाही केला आहे. 1.9 लाख मेगावॉट ऊर्जा क्षमता असणारी भेल ही भारतातील सर्वात निर्माती कंपनी आहे.