ऑनलाईन टीम / लखनऊ :
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे देशभरातील जनता मेटाकुटीला आली आहे. त्यावर भोपाळ महानगरपालिकेने स्वस्त डिझेल खरेदी करणारा नवा जुगाड शोधला आहे. भोपाळ महानगरपालिका आता उत्तर प्रदेशातून डिझेल खरेदी करत असून, त्यामधून प्रतिलिटर 12.46 रुपयांची बचत होत आहे. मध्यप्रदेशात डिझेल प्रति लिटर 95.96 रुपये आहे, तर महापालिकेला पेट्रोलियम कंपन्यांकडून मिळणाऱ्या सवलतीचा फायदा घेत झाशीतून 83.50 रुपये प्रति लिटरमध्ये डिझेल खरेदी करण्यात येत आहे.