प्रतिनिधी/ फोंडा
भोम अडकोण पंचायतीतर्फे पंचायत क्षेत्रातील बेकायदेशीर भंगारअड्डय़ावर धडक कारवाई करण्यात आली. मुस्लिमवाडा भोम येथील दोन बेकायदेशीर भंगारअड्डय़ावर कारवाई करून जेसीबीच्या सहाय्याने भंगार अंड्डे जमिनदोस्त पेले. यावेळी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी फोंडय़ाचे मामलेदार कौशिक देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्तात सदर कारवाई काल सकाळी 10.30 वा. सुमारास करण्यात आली.
यावेळी विस्तार अधिकारी दिनकर कोसंबे, गट विकास कार्यालयाचे अभियंते रविंद्र नाईक, सार्वजनिक बांधकाम खात्याचे व गट विकास कार्यालयाचे अधिकारी तसेच पंचायतीतर्फे सरपंच सुनिल भोमकर, उपसरपंच दामोदर नाईक, पाणो गावडे, स्थानिक पंच वर्षा नाईक, शैलेश नाईक उपस्थित होते.
यावेळी बोलताना सरपंच सुनिल भोमकर म्हणाले की या भंगार अड्डय़ावर पंचायत राज कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. प्रत्येक ग्रामसभेत स्थानिक भंगारअड्डयाविषयी ग्रामसभेत उपस्थित करीत असे त्याचप्रमाणे या पंचायत क्षेत्रात एकूण 14 भंगारअड्डे असून बहुतेक भंगार अड्डयावर कारवाई झालेली असून यापुढेही बेकायदेशीर असलेल्या भंगारअंड्ढय़ावर करवाई होणार असल्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले.
बेकायदेशीर भंगार अड्डयावर अनेक गैरप्रकार सुरू असल्याचे ग्रामस्थांनी पंचायतीच्या निदर्शनास आणून दिले होते. मुस्लिमवाडय़ावरील बेकायदेशीर भंगारअड्डे हटविल्याने परीसर स्वच्छ झाल्याची प्रतिक्रीया उपसरपंच शैलेश नाईक यांनी दिली.सदर कारवाईवेळी ग्रामसभेत या अड्डयाविषयी आवाज उठविणारे ग्रामस्थही मोठया संख्येने उपस्थित होते.