वेंगुर्ले/प्रतिनिधी-
वेंगुर्ले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या मुंबई येथील सिल्वरओक बंगल्यावर एस.टी. संपकरी कर्मचाऱ्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयसमोर निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच एस.टी. कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणारे गुणवंत सदावर्ते यांना तात्काळ अटक करुन त्यांचेवर कारवाई करा अशी मागणी करत गुणवंत सदावर्ते यांचा निषेध करणाऱ्या घोषणा देण्यात आल्या. वेंगुर्ले राष्ट्रवादीतर्फे वेंगुर्ले तहसीलदारांना या संदर्भातील निवेदन सादर करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सदस्य एम. के. गावडे, महिला प्रदेश सचिव सौ नम्रता कुबल, वेंगुर्ले प्रभारी तालुकाध्यक्ष सत्यवान साटेलकर, सौ. प्रज्ञा परब, जिल्हा शिक्षक सेलचे अध्यक्ष अँथोनी डिसोजा, जिल्हा डॉ. सेलचे अध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत, जिल्हा सरचिटणीस मकरंद परब, जिल्हा सदस्य नितीन कुबल, माजी उपनगराध्यक्ष वामन कांबळे, बबन पडवळ या सहित राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.Attachments area