ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरलेले फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सरकोजी (वय 66) यांना स्थानिक न्यायालयाने एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
सरकोजी 2007 ते 2012 या कालावधीत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष होते. 2014 मध्ये सरकोजी यांनी मोनॅकोमध्ये एका न्यायाधिशाला लाच देऊन त्यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या निवडणूक प्रचार मोहिमेच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या तपासणी संदर्भातील अंतर्गत माहिती मागवली होती. सरकोजी यांच्यावर 2007 मध्ये निवडणूक प्रचार मोहिमेसाठी लिबियातून पैसे घेतल्याचाही आरोप आहे.
दरम्यान, न्यायालयाने सरकोजींना त्यांच्याच घरात इलेक्ट्रॉनिक ब्रेसलेटसोबत कैद होण्यासाठी अर्ज करण्याची परवानगी दिली आहे.