साहित्य : 1 कैरी, 2 चमचे गूळ, पाव चमचा हळद पावडर, पाव वाटी चिंचेचा कोळ, चवीपुरते मीठ, मसाल्यासाठीः 1 वाटी ओलं खोबरं खिसून, 2 चमचे उडीदडाळ, 1 चमचा चणाडाळ, पाव चमचा मेथीदाणे, अर्धा चमचा जिरं, 2 चमचे तीळ, 4 लाल सुक्या मिरच्या, फोडणीसाठीः 2 चमचे तेल, चिमुटभर हिंग, 1 चमचा मोहरी, 4 कढीपत्ता पाने
कृती : कैरीचे तुकडे करून साधारणपणे वाटीभर गर काढावा. आता हा गर प्रेशर कुकरच्या भांडय़ात घेऊन त्यात चिंचेचा कोळ, गूळ, हळद पावडर आणि मीठ टाकून मिक्स करावे. आता कुकरच्या दोन शिट्टय़ा घ्याव्यात. गरम पॅनमध्ये उडीदडाळ, चणाडाळ, मेथीदाणे, जिरं, तीळ आणि लाल सुक्या मिरच्या परतवून गार होण्यास ठेवावे. आता मिक्सर जारमध्ये ओलं खोबरं आणि पॅनमध्ये परतलेले साहित्य घालावे. त्यात थोडेसे पाणी घालून पेस्ट बनवावी. ही पेस्ट तयार कैरीच्या मिश्रणात मिक्स करावी. आता फोडणीसाठी गरम तेलात मोहरी टाकून तडतडावी. नंतर हिंग आणि कढीपत्ता टाकावा. तयार तडका कैरीच्या मिश्रणावर घालावे. ही मँगो करी भात अथवा फुलक्यासोबत खाण्यास द्या.