इंग्लिश प्रीमियर लीग : बर्नलीवर 3-1 फरकाने मात
मँचेस्टर / वृत्तसंस्था
ख्रिस्तियानो रोनाल्डोने हंगामातील 8 वा गोल नोंदवल्यानंतर मँचेस्टर युनायटेडने ओल्ड ट्रफोर्ड मैदानावर बर्नलीवर 3-1 अशा फरकाने एकतर्फी विजय संपादन केला. या विजयासह मँचेस्टर युनायटेडने इंग्लिश प्रीमियर लीग गुणतालिकेत सहाव्या स्थानी झेप घेतली. पहिल्या सत्रात आठव्या मिनिटालाच रोनाल्डोने मॅकटोमिनेला गोलसाठी असिस्ट केले. नंतर जॅडॉन सँचोच्या लो शॉटवर 27 व्या मिनिटाला बर्नलीच्या बेन मीकडून स्वयंगोल झाला. यामुळे मँचेस्टरची आघाडी 2-0 अशी भक्कम झाली. त्यानंतर 35 व्या मिनिटाला रोनाल्डोने आपला पहिला व संघाचा तिसरा गोल केला.
ऍरॉन लिनॉनने 3 मिनिटांच्या अंतराने 2018 नंतर आपला पहिलाच प्रीमियर लीग गोल करत मँचेस्टर युनायटेडची आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. पण, यापेक्षा आणखी काहीही त्यांना साध्य करता आले नाही. मँचेस्टर युनायटेडच्या खात्यावर आता 31 गुण असून त्यांनी अर्सेनलला चौथ्या स्थानी फेकले. बर्नलीचा संघ 11 गुणांसह 18 व्या स्थानी कायम राहिला.