वृत्तसंस्था/ लंडन
2020-21 प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेतील शुक्रवारी ओल्ड ट्रफोर्ड मैदानावर झालेल्या सामन्यात मँचेस्टर युनायटेडने ऍस्टोन व्हिलाचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव करत स्पर्धेच्या गुणतक्त्यात दुसऱया स्थानावर झेप घेतली आहे.
या स्पर्धेच्या गुणतक्त्यात मँचेटर युनायटेड आणि लिव्हरपूल या दोन्ही संघांनी समान गुण नोंदविले असले तरी सरस गोल सरासरीच्या आधारे लिव्हरपूलने मँचेस्टर युनायटेडला मागे टाकले आहे. शुक्रवारच्या सामन्यात पूर्वार्धात मँचेस्टर युनायटेडचे खाते अँथोनी मार्शलने उघडले. त्यानंतर उत्तरार्धातील पहिल्या पाच मिनिटात जॅक ग्रिलेसने अस्टोन व्हिलाला बरोबरी साधून दिली. सामना संपण्यास 10 मिनिटे बाकी असताना ब्रुनो फर्नांडिसने पेनल्टीवर मँचेस्टर युनायटेडचा दुसरा आणि निर्णायक गोल नोंदविला. या दोन संघामध्ये यापूर्वी झालेल्या 10 सामन्यापैकी मँचेस्टर युनायटेडने 8 सामने जिंकले आहेत.