मँचेस्टर
इव्हान शार्प हे मँचेस्टर युनायटेडचे नवे साहायक प्रशिक्षक असतील, अशी घोषणा या संघाचे अंतरिम व्यवस्थापक राल्फ रँगनिक यांनी बुधवारी केली. स्कॉट्समन इव्हान शार्प यांनी यापूर्वी न्यूयॉर्क रेड बुल्स व टोरोन्टो एफसी संघासमवेत काम केले असून अमेरिकेत नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीत त्यांनी 2 वर्षे डायरेक्टर ऑफ परफॉर्मन्स ऍनालिस्ट म्हणूनही पदभार हाताळला आहे. इव्हान यांनी यंदा फेब्रुवारीमध्येच टोरोन्टो एफसीच्या साहायक प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारली होती. मँचेस्टर युनायटेडचे पुढील सामने न्यू कॅसल युनायटेड (27 डिसेंबर) व बर्नली (30 डिसेंबर) विरुद्ध होत आहेत.