वृत्तसंस्था / अंकारा
युरोपमधील प्रिमियर क्लबस्तरीय फुटबॉल लीग स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात तुर्कीश चॅम्पियन इस्तंबुल बसाकसेहरने मँचेस्टर युनायटेडचा 2-1 अशा गोल फरकाने पराभव केला. या स्पर्धेतील मँचेस्टर युनायटेडचा हा पहिला पराभव आहे.
या सामन्यात 12 व्या मिनिटाला इडीन व्हिस्काने दिलेल्या पासवर देंबा बाने इस्तंबुलचे खाते उघडले. मध्यंतराला पाच मिनिटे बाकी असताना इस्तंबुलचा दुसरा गोल व्हिस्काने केला. मध्यंतराला दोन मिनिटे बाकी असताना मँचेस्टर युनायटेडतर्फे एकमेव गोल अँथोनी मार्शलने हेडरद्वारे नोंदविला. दरम्यान या सामन्यात शेवटपर्यंत मँचेस्टर सिटीला इस्तंबुलशी बरोबरी साधता न आल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. या स्पर्धेत इस्तंबुलने या विजयामुळे गुणतक्त्यात आपले खाते उघडले. गेल्यावर्षीच्या फुटबॉल हंगामात या स्पर्धेत उपविजेतेपद मिळविणाऱया पॅरीस सेंट जर्मन आणि आरबी लिपझीग या दोन संघांना मँचेस्टर युनायटेडने पराभूत केल्याने ते या स्पर्धेच्या गुणतक्त्यात च गटात 6 गुणांसह आघाडीवर आहेत.