वृत्तसंस्था / मँचेस्टर
प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेत शनिवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात रहिम स्टर्लींगच्या एकमेव निर्णायक गोलाच्या जोरावर मँचेस्टर सिटी संघाने अर्सेनलचा 1-0 अशा गोलफरकाने पराभव केला.
हा सामना शेवटच्याक्षणापर्यंत चुरशीचा झाला. सामन्यांच्या पूर्वार्धात स्टर्लींगने मँचेस्टर सिटीचा एकमेव गोल नोंदविला. या विजयामुळे स्पर्धेच्या गुणतक्यात मँचेस्टर सिटी संघाने आघाडीचे स्थान मिळविले आहे. शनिवारच्या सामन्यात मँचेस्टर सिटीने पूर्ण गुण वसूल केले. या स्पर्धेत चालूवर्षीच्या फुटबॉल हंगामात अर्सेनल संघाला एकही विजय नोंदविता आला नाही. मँचेस्टर सिटीने नव्या फुटबॉल हंगामात लीग स्पर्धेतील पहिल्या तीनपैकी दोन सामने गमविले आहेत.