वृत्तसंस्था/ मँचेस्टर
मँचेस्टर सिटी फुटबॉल क्लबने लीग चषक फुटबॉल स्पर्धेची सलग चौथ्या हंगामात अंतिम फेरी गाठली. बुधवारी ओल्ड ट्रफोर्ड मैदानावर या स्पर्धेतील झालेल्या अटीतटीच्या उपांत्य सामन्यात मँचेस्टर सिटीने मँचेस्टर युनायटेडचा 2-0 अशा गोलफरकाने पराभव केला.
या सामन्यात मँचेस्टर सिटी संघातर्फे जॉन स्टोनेस आणि फर्नांडिन्हो यांनी प्रत्येकी एक गोल केला. या स्पर्धेत आता 25 एप्रिल रोजी विंम्बलेच्या मैदानावर मँचेस्टर सिटी आणि टॉटनहॅम यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. मँचेस्टर सिटीने 2017 साली या स्पर्धेचे जेतेपद मिळविले होते त्यावेळी जोस मॉरेनो हे मँचेस्टर सिटीचे प्रमुख बॉस होते. आता टॉटनहॅम संघाला जोस मॉरेनो यांचे मार्गदर्शन लाभत आहे.