प्रतिनिधी / कोल्हापूर
फुलेवाडी रिंगरोड परिसरातील एका मंगल कार्यालयाच्या जानवस खोलीतून सहा तोळ्यांचा सोन्याचा राणीहार चोरट्याने लंपास केला. याबाबतची फिर्याद अमरसिंह वसंतराव कमते (वय 42, रा. सणगर गल्ली, मंगळवार पेठ) यांनी करवीर पोलीसांत दिली. त्यानूसार अज्ञाता विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी कमते यांच्या नातेवाईकांचे बुधवारी सकाळी फुलेवाडी रिंगरोडवरील एका मंगल कार्यालयातील लॉनवर लग्न होते. त्यांच्या सासुने त्यांचा 2012 साली केलेला सोन्याचा सहा तोळ्यांचा राणीहार सोबत आणला होता. तो जानवस खोलीमध्ये गुलाबी रंगाच्या पिशवीत ठेवला होता. हा हार त्यांच्या अनुपस्थितीत अज्ञात चोरट्याने लांबविला. या चोरीची तक्रार सासूच्यावतीने कामते यांनी करवीर पोलीसांत दाखल केली. या चोरीचा तपास पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद राळेभात हे करीत आहेत.