तालुक्मयात 334 रुग्ण आढळले कोरोना पॉझिटिक्ह
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा हजाराच्या घरात पोहोचली असून मंगळवारी जिल्हय़ात 1,053 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या वाढतच चालली आहे. सोमवारी कमी रुग्णसंख्या आढळली असताना पुन्हा मंगळवारी ती दुपटीने वाढल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. मंगळवारी तालुक्मयामध्येही 334 कोरोना पॉझिटिक्ह रुग्ण आढळले आहेत. शहरासह ग्रामीण भागातही रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे.
मंगळवारी भाग्यनगर, आदर्शनगर, अनगोळ, अंजनेयनगर, आझमनगर, भडकल गल्ली-वडगाव, बसवाण गल्ली, भडकल गल्ली-बेळगाव, चौगुलेवाडी, कपिलेश्वर कॉलनी, नेहरूनगर, जाधवनगर, काकर गल्ली, कपिलेश्वर रोड, खडेबाजार, खासबाग, कोतवाल गल्ली, कुवेंपूनगर, महांतेशनगर, मुजावर गल्ली, रामनगर, रामतीर्थनगर, कॅम्प, चव्हाट गल्ली, गुरुप्रसाद कॉलनी, हनुमाननगर, टिळकवाडी, श्रीनगर, शिवबसवनगर, तांगडी गल्ली, वडगाव, वैभवनगर, वंटमुरी कॉलनी, विनायकनगर, सदाशिवनगर, विश्वेश्वरय्यानगर, संगमेश्वरनगर, कणबर्गी, शिवशक्तीनगर या परिसरात रुग्ण आढळले आहेत.
ग्रामीण भागातही रुग्णसंख्या वाढली असून अनेक गावांमध्ये पॉझिटिक्ह रुग्ण आढळून येत आहेत. अनेक गावांनी यामुळे लॉकडाऊन आणि कठोर नियमांची अंमलबजावणी केली आहे. तरीदेखील रुग्णसंख्या वाढत आहे. मंगळवारी येळ्ळूर, नसलापूर, पिरनवाडी, वाघवडे, सरस्वतीनगर, धामणे, बिजगर्णी, गणेशपूर, खादरवाडी, सुतगट्टी, नावगे, उचगाव, बेळगुंदी, कुकडोळी, हुदली, कल्लेहोळ, कट्टणभावी, नागेनहट्टी, देवगणहट्टी, झाडशहापूर, हुंचेनहट्टी, मुत्नाळ, बेन्नाळी आदी गावांमध्ये रुग्ण आढळले आहेत.
कोरोनाने पाच जणांचा मृत्यू कोरोनामुळे मंगळवारी पाच जणांचा मृत्यू झाला असून जिल्हय़ामध्ये आतापर्यंत 404 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होतानाच आता दररोज पाचपेक्षा अधिक जणांचा मृत्यू होताना दिसत आहे. त्यामुळे काहीसे भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्या एकूण 15,164 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळांमध्ये उपचार करण्यात येत आहेत.