प्रतिनिधी / बेळगाव
दुरूस्तीच्या कारणास्तव मंगळवार दि. 4 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 यावेळेत टिळकवाडी परिसरातील विजपुरवठा ठप्प असणार आहे. मारूती कॉलनी, मराठा कॉलनी, एस. व्ही. कॉलनी, कॉंग्रेस रोड, पहिला रेल्वेगेट, नेहरू रोड, सावरकर रोड, रॉय रोड, वॅक्सिन डेपो ग्राऊंड, रानडे रोड, आगरकर रोड, दुसरा रेल्वे गेट, हिंदु नगर, राणा प्रताप रोड, रविंद्रनाथ टागोर रोड, नानावाडी परिसर, आश्रयवाडी, अंगडी कॉलेज रोड पसिरात विजपुरवठा बंद असणार आहे. याचा नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन हेस्कॉम शहर उपविभाग 2 कडून करण्यात आले आहे.