प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या गणेशोत्सवाबद्दल संभ्रमावस्था वाढली आहे. मंगळवारी यासंबंधी ठोस निर्णय जाहीर होण्याची शक्मयता आहे. सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात वरि÷ अधिकाऱयांची बैठक झाली असून या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, महानगरपालिका आयुक्त जगदीश के. एच. आदी अधिकाऱयांची बैठक झाली. या बैठकीत बेळगाव शहर व जिल्हय़ातील सद्यस्थितीबद्दल चर्चा करण्यात आली आहे.
वेगवेगळय़ा गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱयांनी वारंवार अधिकाऱयांची भेट घेऊन उत्सवासंबंधी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. अनेक मंडळांनी मुहूर्तमेढ रोवण्यासही सुरुवात केली आहे. तरीही प्रशासनाने आपली भूमिका मांडली नाही. उपलब्ध माहितीनुसार राज्य सरकारकडून येणाऱया मार्गसूचीची अधिकाऱयांना प्रतीक्षा आहे.
मंगळवारी सायंकाळपर्यंत यासंबंधी एक चित्र स्पष्ट होणार आहे. बागलकोट, विजापूरसह अनेक जिल्हय़ांनी सार्वजनिक गणेशोत्सवावर बंदी घातली आहे. कोरोना महामारीच्या वाढत्या संकटामुळे केवळ घरगुती गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, बेळगावात प्रशासनाने अद्याप भूमिका घेतलेली नाही.
पुण्या-मुंबईपाठोपाठ बेळगावात मोठय़ा प्रमाणात गणेशोत्सव साजरा होतो. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाने अद्याप स्पष्ट भूमिका जाहीर केली नाही त्यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत चित्र स्पष्ट होणार असल्याचे एका वरि÷ अधिकाऱयांनी सांगितले.
दरम्यान, मध्यवर्ती श्री सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ शहापूर विभागाच्या पदाधिकाऱयांनी सोमवारी पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांची भेट घेऊन भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. गोकुळाष्टमीला अनेक मंडळे मुहूर्तमेढ रोवतात. त्याआधी जिल्हा प्रशासनाने गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन करण्याची मागणी केली आहे. मंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक नेताजी जाधव, कार्याध्यक्ष माजी नगरसेवक रमेश सोंटक्की, अशोक चिंडक, राजू सुतार यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
नियम व अटी घालून परवानगी?
सोमवारी रात्रीपर्यंत जिल्हा प्रशासन गणेशोत्सवाबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार, अशी अपेक्षा होता. मात्र, राज्य सरकारकडून ठोस नियमावली उपलब्ध न झाल्याने निर्णय मंगळवारपर्यंत लांबला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर त्या त्या जिल्हय़ातील परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱयांना देण्यात आला आहे. नियम व अटी घालून सार्वजनिक गणेशोत्सवाला परवानगी देण्याची शक्मयता आहे.