बेंगळूर/प्रतिनिधी
मंगळवारी कर्नाटकात ३६६ नवीन कोरोना प्रकरणांची नोंद झाली आहे. तर ५१३ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले आहेत. तसेच दोन बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान राज्यात एकूण कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या ९,४३,२१२ वर पोहोचली आहे. यापैकी ९,२५,१६७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान राज्यात ५,७८५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आयसीयूमध्ये १४३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कर्नाटकात कोविडमुळे एकूण १२,२४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मंगळवारी राज्यात एकूण ६०,४८५ नवीन कोविड नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. यापैकी ४,५८९ रॅपिड अँटीजेन्स व ५५,८९६ आरटी-पीसीआरद्वारे चाचण्या करण्यात आल्या आहेत.
बेंगळूर शहरी जिल्ह्यात १९५ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४,००,८८७ वर पोहोचली असून त्यापैकी ३ ,९२,७१५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.