प्रतिनिधी/ म्हापसा
बार्देश तालुक्यात तोतया पोलीस बनून महिलांच्या सोनसाखळी, मंगळसूत्र हिसकावून पळ काढणाऱया अज्ञात चोरटय़ाचे रेखाचित्र पोलिसांनी तयार केले असून त्या चोरटय़ाने वापरलेल्या दुचाकीचाही सुगावा पोलिसांना लागला आहे. हे चोरटे इरानी गँगचे असावे असा प्राथमिक अंदाज असून पोलीस त्या दृष्टीने तपास करीत आहेत. अशी माहिती म्हापसा पोलीस स्थानकाचे निरीक्षक परेश नाईक यांनी दिली.
अलीकडेच दत्तवाडी म्हापसा येथे एका महिलेच्या गळय़ातील मंगळसूत्र दुचाकीवरून येऊन हीसकावून नेले होते शिवाय बांगडय़ा, अंगठय़ाही घेऊन पसार झाले होते. अशी चोरी इरानी गँग करते असा सुगावा पोलिसांना लागला आहे. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोरटे एकटय़ा जाणाऱया महिलांना टार्गेट करतात. आपण पोलीस असल्याचे भासवून याठिकाणी चोर्या जास्त होतात dसे सांगून दागिने रुमाल व बॅगमध्ये ठेवा असे सांगून ते दागिने घेऊन पसार होतात अशी त्यांची मोडीस ओपरेन्टी असते. पोलिसांच्या हाती काही सुगावे लागले असून म्हापसा पोलीस त्यादृष्टीने तपास करीत असल्याची माहिती निरीक्षक नाईक यांनी दिली.
चोऱया कमी व्हायला पाहिजे. चोऱया होणे ही गंभीर गोष्ट असून आपण नवीनच ताबा घेतला आहे. चोऱयाबाबत आपण पोलिसांनी सतर्क राहण्यास सांगितले असून बीट पोलिसांच्या डय़ुटीतही बदल केला असून त्यांना 24 तास पोलीस आवारात हजर राहण्यास सांगितल्याचे पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी म्हणाले.