मंगळूर/प्रतिनिधी
गेल्या काही तासांपासून मंगळूरला पावसाने झोडपून काढलं आहे. मंगळूरच्या बर्याच भागाती वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरु आहे. के एस राव रोड, बेजाई, कोतारा चौकी आणि शहरातील इतर भागात रस्त्यावर पाणी साचले आहे. दरम्यान मुसळधार पावसात लोकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करणे कठीण झाले. अनेकजण छत्री घेऊन खरेदी करण्यासाठी बाहेर पडले होते.
आयएमडीने जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला होता. दक्षिण कन्नड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मान्सूनपूर्व सरी कोसळत आहेत. यासह, किनारपट्टी भागात मान्सून प्रवेश होण्यापूर्वीच या प्रदेशाला पावसाने झोडपले आहे. एप्रिल आणि मे या काळात मान्सूनपूर्व सरी पडल्यामुळे जिल्ह्याचे यंदा पाण्याचे संकट दूर केले. मान्सूनपूर्व पावसामुळे धान लागवडीपूर्वी शेतकऱ्यांना शेतीची कामे सुरू करण्यास मदत होणार आहे.