ऑनलाईन टीम / मंगळूरू :
मंगळूरू विमानतळ अदानी समूहाकडे 50 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्यात आले आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने यासंदर्भात माहिती दिली.
लखनऊ, अहमादबाद आणि मंगळूरू विमानतळ विकसित करून चालविण्यास देण्याकरिता खासगी कंपन्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यामध्ये अदानी समूहाने बाजी मारली होती. विमानतळासंदर्भात भारतीय विमानतळ प्राधिकरणाला सवलत देण्याच्या करारावर अदानी समूहाने 14 फेब्रुवारी 2020 रोजी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. या तीन कंपन्यांशी 21 ऑक्टोबर रोजी सामंजस्य करारही झाले आहेत. त्यानुसार आता भारतीय विमानतळ प्राधिकरणाने अदानी समूहाला मंगळूरू विमानतळ 50 वर्षांसाठी भाडेतत्वावर दिले आहे.
यापूर्वी अदानी समूहाने अहमदाबाद, जयपूर, लखनऊ, तिरुअनंतपुरम आणि मंगळुरू या पाच विमानतळांच्या परिचलनाचे कंत्राट मिळविले आहे.