मंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकच्या मंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर (एमआयए) कस्टमच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दुबईहून आलेल्या एका प्रवाशाला अटक केली आहे. त्याने १.७७ किलो सोन्याची तस्करी केल्याचा आरोप आहे.
एमआयएच्या सीमाशुल्क विभागाच्या माहितीनुसार, प्रवाशाची ओळख पटली असून इस्माईल अहमद कल्लार असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो मूळचा केरळमधील कासारगौड येथील रहिवासी आहे. “कालार आज (शुक्रवारी) स्पाइसजेटच्या फ्लाइट नंबर एसजी १४६ द्वारे दुबईहून आला होता. तो गममध्ये मिसळलेला सोन्याचा तुकडा घेऊन जात होता आणि त्याच्या अंडरगारमेंटमध्ये लपविला होता. तपासणी केली असता त्याला अटक करण्यात आली आहे, असे अधिकारी म्हणाले. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या मौल्यवान वस्तूंची किंमत ५७,१४९४० रुपये असल्याचे एका सीमाशुल्क अहवालात म्हटले आहे.