मंगळूर/प्रतिनिधी
मंगळूर येथे बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या ३८ श्रीलंकन नागरिकांना मंगळूर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. हे सर्व श्रीलंकन नागरिक मार्चच्या मध्यात तमिळनाडूला पोहोचले, त्यानंतर बेंगळूर आणि त्यानंतर ते मंगळूर येथे आले. दरम्यान या श्रीलंकन नागरिकांना मदत करणार्या ६-७ नागरिकांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
मंगळूर पोलीस आयुक्त आयुक्त शशी कुमार यांनी आज मंगळूर येथे बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या ३८ श्रीलंकन नागरिकांना पोलिसांनी अटक केली असल्याचे सांगितले. तसेच या सर्वांना याठिकाणी राहण्यास मदत करणाऱ्या अन्य ६ ते ७ नागरिकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगितले.