वार्ताहर / मंगसुळी
मंगसुळी-लोकूर ग्रुप ग्रामपंचायतीच्या 40 जागांसाठी 90 जण रिंगणात उतरले आहेत. ग्रा. पं. च्या माजी पदाधिकाऱयांसह ता. पं. व जि. पं. सदस्यांनीही या दुसऱया टप्प्यातील निवडणुकीत लक्ष घातल्याने अनेक उमेदवारांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.
मंगसुळी येथील 31 जागांसाठी 70 तर लोकूर येथील 9 जागांसाठी 20 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. मंगसुळी येथे भाजपमध्ये जुना व नवा असे दोन गट पडले आहेत. या निवडणुकीत युवा उमेदवारही उतरले आहेत. त्यामुळे तुल्यबळ लढती दिसत असून जो तो स्वतःसाठी निवडून येण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी मतदारांना विविध प्रकारची आमिषेदेखील दाखविण्यात येत असून उमेदवार पायाला भिंगरी बांधून प्रचार यंत्रणा राबवित आहेत. मात्र मतदार सुज्ञ असल्याने तो नेमका कोणाला निवडून देणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.