प्रतिनिधी / बेळगाव
दिवसेंदिवस कोरोनाचा फैलाव वाढत चालला आहे. त्यामुळे संसर्गाचा धोका लक्षात घेऊन श्री मंगाई देवीची यात्रा रद्द करण्यात आली आहे. प्रशासनाने यापूर्वीच पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
रविवारी देवस्थान कमिटीनेही भाविकांना आवाहन केले आहे. भाविकांच्या आरोग्याचा विचार करून व संभाव्य धोका लक्षात घेऊन मंदिर परिसरात कोणीही दर्शनासाठी येऊ नये, अशी विनंती करण्यात आली आहे.
श्री मंगाई देवस्थान कमिटीची रविवारी सकाळी तातडीची बैठक झाली. मंदिर परिसरात झालेल्या या बैठकीत भाविकांच्या सुरक्षिततेचा विचार करून कोणीही सध्या दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस आयुक्तांनीही यात्रा रद्दचा निर्णय जाहीर केला होता.