मुरगुड / वार्ताहर
सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्याचा 27 वा गळीत हंगाम शुभारंभ आज शुक्रवार दि. 30 रोजी सकाळी 11 वा. राधानगरी -भुदरगडचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते व चेअरमन खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
तत्पूर्वी सकाळी 10. 30 वा. कारखान्याच्या जुन्या प्रशासकीय इमारतीमधील कोविड सेंटरचे उद्घाटन खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते होणार आहे. तरी सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे. असे आवाहन व्हाईस चेअरमन बंडोपंत चौगुले आणि कार्यकारी संचालक एन. वाय. पाटील यांनी केले आहे.