भाजपमध्ये चर्चेला वेग ः 30 रोजी पोटनिवडणूक
वृत्तसंस्था/ शिमला
हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघात होणाऱया पोटनिवडणुकीत बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत उमेदवार असू शकते. या मतदारसंघाचे भाजप खासदार रामस्वरुप शर्मा यांचे मार्च महिन्यात निधन झाले होते. तेव्हापासून हा मतदारसंघ रिक्त आहे. मंडी लोकसभा मतदारसंघासह तीन विधानसभा मतदारसंघांमध्येही 30 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे.
हिमाचल प्रदेश पोटनिवडणुकीसाठी भाजपची समिती धर्मशाळामध्ये बैठक घेणार आहे. भाजपचा एक गट मंडी मतदारसंघाकरता कंगना रनौतला उमेदवारी देऊ इच्छितो. तर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वामध्येही उमेदवारांवरून चर्चा आहे. पण कंगनाने उघडपणे निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केलेली नाही.
कंगना रनौत ही मूळची मंडी जिल्हय़ातील भांबला गावची आहे. तसेच मनालीमध्ये तिने स्वतःचे घर निर्माण पेले आहे. मनाली देखील मंडी लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येते. मंडीसोबत हिमाचलमध्ये फतेहरपूर, जुब्बल कोथकाई आणि अर्की विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या निधनामुळे अर्की मतदारसंघ रिक्त झाला आहे. उर्वरित दोन्ही मतदारसंघामध्ये देखील आमदारांच्या निधनामुळे पोटनिवडणूक होत आहे.