बेळगाव :दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित मंडोळी हायस्कूल, मंडोळीमध्ये केंद्र सरकार दिल्ली व नीती आयोग दिल्ली यांच्याकडून अनुदान प्राप्त अटल टिंकरिंग लॅबचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा मंडळाचे अध्यक्ष डी. एल. आंबेवाडीकर होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक के. व्ही. जठार यांनी केले.
द. म. शि. मंडळाचे उपाध्यक्ष ऍड. राजाभाऊ पाटील यांच्या हस्ते अटल लॅबचे उद्घाटन केले. दीपप्रज्वलन द. म. शि. मंडळाचे सचिव प्रा. विक्रम पाटील, बीआरसी प्रमुख महादेव मेदार, फाऊंडर रोबेस्टेम लर्निंग सोल्युशनचे निरंजन देसाई, ग्रा. पं. अध्यक्षा लक्ष्मी कणबरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
द. म. शि. मंडळाचे सहसचिव डॉ. दीपक देसाई यांनी महात्मा फुले-सावित्रीबाई फुले व भाई दाजिबा देसाई यांच्या प्रतिमांचे पूजन केले. यावेळी ज्योती महाविद्यालयाचे माजी प्राचार्य एम. बी. निर्मळकर, संचालक पी. पी. बेळगावकर, शिक्षण संयोजक अरुण कांबळे, हिंडलगा सीआरसी प्रमुख सतीश पाटील, बेळगाव तालुका माध्यमिक सहशिक्षक संघाचे अध्यक्ष मल्लाप्पा निंगाप्पा तल्लूर, शाळा सुधारणा मंडळाचे सदस्य एम. के. पाटील, वाय. बी. शहापूरकर, मारुती हुंदे, पुंडलिक असोगेकर, यल्लाप्पा कणबरकर, के. वाय. घाटेगस्ती, इतर शाळांचे मुख्याध्यापक व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी निरंजन देसाई यांनी अटल लॅबबद्दल सविस्तर माहिती दिली. उपस्थित मान्यवरांनी अटल लॅबबद्दल मनोगत व्यक्त केले. यावेळी ग्रामस्थ, सर्व शिक्षकवर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन एस. एन. बेळगुंदकर यांनी केले. विज्ञान शिक्षिका एस. के. दिवटे यांनी आभार मानले.