वार्ताहर / किणये
द. म. शि. मंडळ संचलित मंडोळी हायस्कूलमध्ये जागतिक मराठी भाषादिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक के. व्ही. जठार हे होते. त्यांच्याच हस्ते कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
प्रारंभी रोपटय़ाला पाणी घालून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सहशिक्षिका सी. एस. चव्हाण यांनी कवी कुसुमाग्रज यांच्या जीवनचरित्राविषयी माहिती देत मराठी भाषेचे महत्त्व आपल्या भाषणातून सांगितले. बहिणाबाई यांच्या काही कविता एस. एम. गुरव यांनी सादर केल्या. मराठी भाषा टिकविण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न झाले पाहिजेत.
सध्याच्या तरुणांमध्ये मराठी भाषेविषयी अधिक जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे पी. पी. गोरल व एस. एस. मुरकुटे यांनी सांगितले.
यावेळी बी. बी. दिवटे, एस. के. दिवटे, एन. एस. मोरे, एन. एफ. गडकरी, एस. वाय. कसलकर आदींसह विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे. जे. पाटील यांनी केले तर एस. एन. बेळगुंदकर यांनी आभार मानले.