मंड्या/प्रतिनिधी
पांडवपुरा तहसीलमधील बेबी बेट्टा टेकडीवरील अवैध उत्खनन रोखण्यासाठी जिल्हा उत्खनन विभागासह पांडवपुरा पोलीस स्टेशनने पुन्हा एकदा पुढाकार घेतला आहे. कृष्णाराज सागर धरणाच्या जवळ बेबी बेट्टा डोंगर असल्याने धरणाला धोका आहे. त्यामुळे अवैध उत्खनन थांबविण्यासाठी जिल्हा खाण विभाग कडक पावले उचलत आहे.
पोलिसांनी बेकायदा उत्खनन सुरु असलेल्या ठिकाणाहून एक जेसीबी आणि एक लॉरी जप्त केली आहे. त्याचबरोबर जिल्हा खाण विभाग अधिकारी पुष्पा यांनी बेबी बेट्टा टेकडीच्या मुख्य चेक पोस्टचे सीसी टीव्ही कॅमेरा आणि ड्रोन कॅमेर्याद्वारे देखरेख करण्याचे निर्देश दिले आहेत. डोंगरावर अवैध उत्खनन प्रक्रिया थांबविण्यासाठी जवळपासच्या गावातील लोकही बेच दिवस झाले मागणी करत होते.
डोंगरावरील खाणीत स्फोट झाल्याने कृष्णराज सागर धरणाच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा किसान संघटना व कन्नड संघटनेने अनेक निदर्शने केली आणि मागण्या केल्या. तसेच धरण वाचविण्यासाठी शेतकर्यांनी कृष्णराज सागर धरणापासून श्रीरंगपटनापर्यंत पदयात्रा काढली आहे.
मंड्या लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुमलता अंबरीश यांनीही धरणाच्या सभोवतालचे अवैध उत्खनन थांबविण्याची मागणी केली होती. पांडवपुरा तहसीलचे आमदार सी.एच. पुत्रराजू यांनी कन्नड राज्योत्सवाच्या वेळी सर्कल इन्स्पेक्टरला फटकारले होते.