प्रतिनिधी/ सातारा
साताऱयात प्रथमच शिवसेनेचे युवा नेते राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे आल्याने शिवसेनेच्या तरुणाईंची अक्षरशः त्यांच्यासोबत फोटो घेण्यासाठी झुंबड उडाली होती. शिवसेनेच्या युवासेनेच्या कार्यकत्यांसाठी आदित्य ठाकरे यांनी खास वेळ देत शासकीय विश्रामगृहामध्ये पंधरा मिनिटे घालवली. त्यांच्याशी हितगुज करत शिवसेना जिह्यात वाढवण्याचे आणि आणखी जोमाने काम करण्याचे आदेश दिले. दरम्यान, त्यांचे स्वागत राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार महेश शिंदे यांनी केले.
सातारा जिह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे शिवसेनेचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे प्रथमच साताऱयात येत आहेत हे माहिती पडताच साताऱयात जमले. शासकीय विश्रामगृहावर कडक बंदोबस्त ठेवला होता. तरीही तो बंदोबस्त असतानाही शिवसैनेच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱयांनी पोलिसांना विनंती करुन शासकीय विश्रामगृहात प्रवेश केला. काही पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना अडवले परंतु वरीष्ठांना फोन करुन बोलवल्यानंतर त्या पोलीस कर्मचाऱयांनी त्यांना आतमध्ये सोडले. मिटींग हॉलमध्ये मंत्री आदित्य ठाकरे यांचे स्वागत मंत्री शंभूराज देसाई, आमदार महेश शिंदे आणि शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांनी केले. यावेळी सातारा शहर व तालुक्यातील शिवसैनिकांनी त्यांची भेट घेवून त्यांचे स्वागत केले. यामध्ये शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सचिन मोहिते, सातारा तालुका प्रमुख दत्ताभाऊ नलावडे, सातारा तालुका उपप्रमुख रमेश बोराटे, सातारा शहर प्रमुख निलेश मोरे, बाळासाहेब शिंदे, अभिजित सपकाळ आदी उपस्थित होते. या सर्व शिवसैनिकांना आदित्य ठाकरेंनी शिवसेना वाढवा, काम जोमाने करा, असे आदेश दिले.