प्रतिनिधी/ बेळगाव
ग्रामीण विकास व पंचायतराज मंत्री के. एस. ईश्वराप्पा हे मंगळवार दि. 10 ऑगस्ट रोजी बेळगाव दौऱयावर येणार आहेत. दोन दिवसांचा त्यांचा दौरा असून बेळगाव, चिकोडी येथे होणाऱया कार्यक्रमात ते भाग घेणार आहेत.
मंगळवारी सायंकाळी 6.30 वाजता ईश्वराप्पा यांचे बेळगाव येथे आगमन होणार आहे. त्या दिवशी येथे त्यांचा मुक्काम आहे. दुसऱया दिवशी सकाळी 8.30 वाजता ते चिकोडीला जाणार आहेत. 10 वाजता चिकोडी येथे होणाऱया ग्राम पंचायत अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या संमेलनात भाग घेणार आहेत.
दुपारी 3 वाजता जिल्हा पंचायत सभागृहात बेळगाव भागातील ग्राम पंचायत अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या मेळाव्यात ते भाग घेणार आहेत. त्यानंतर विमानाने ते बेंगळूरला रवाना होणार आहेत.