प्रतिनिधी / पणजी
भारतीय उद्योग परिसंघ (सीआयआय) गोवातफ्xढ येत्या काही महीन्यात गोव्याबाहेर कामगार दलाच्या हालचालींबाबतची चिंता व्यक्त केली आहे. उद्योगाच्या कामकाजांवर परिणाम आणि कायद्यातील आवश्यक दुरुस्तीसह ही कमतरता दूर करण्याची गरज असल्याचे मत सीआयआयच्या विशेष बैठकीत व्यक्त करण्यात आले.
सीआयआय गोवाच्या या विशेष बैठकीत कामगार व रोजगार मंत्री जेनिफ्ढर मोन्सेरात, सीआयआय गोवाचे अध्यक्ष ब्लेझ कोस्टाबीर, सीआयआय गोवाचे माजी अध्यक्ष श्रीनिवास धेंपो आणि 30हुन अधिक सदस्य उपस्थित होते. वेतन देण्यास अनिवार्य करण्याच्या कारणास्तव उद्योगांना अडचणी येत असल्याचे प्रसंगी सभासदांनी सांगितले. अजूनही जगण्याच्या परिस्थितीशी झुंज देत असून या विषयावर शासनाची मदतही मागतिली आहे. पर्यटन आणि हॉटेल उद्योगांसमोर असणारा प्रश्न सीआयआयनेदेखील मांडला आहे. पुढच्या 6 ते 8 महीन्यांत पर्यटनाला कमी किंवा काही अपेक्षित उत्पन्नाची अपेक्षा नाही.