ऑनलाईन टीम / मुंबई :
ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. कामगार आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. स्वतः वळसे पाटील यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, नुकतीच माझी कोरोना चाचणी करण्यात आली असून, त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून कसलाही त्रास नाही. खबरदारीचा उपाय म्हणून मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी दक्षता म्हणून कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन ही त्यांनी केले आहे.
पुढे ते म्हणाले, आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद यांच्या बळावर मी लवकरात लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईन. धन्यवाद! असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसात उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे यांना देखील कोरोनाची बाधा झाली आहे.