प्रतिनिधी / कुडचडे
यंदा दहावीच्या परीक्षेत 95.5 टक्के गुण प्राप्त करून कुडचडे येथील गार्डियन एंजल हायस्कूलमध्ये प्रथम क्रमांक मिळविलेली सावर्डे मतदारसंघातील विद्यार्थिनी दिया गौतम सावर्डेकर हिच्या यशाबद्दल सावर्डेचे आमदार असलेले सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांनी तिचे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
मुलांनी शिकावे, मोठे व्हावे व देशाचे चांगले नागरिक बनावे हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते. दिया सावर्डेकर हिने दहावीत अव्वल गुण प्राप्त करून एक स्वप्न पूर्ण केले आहे. तिला यापुढेही असेच चांगले यश प्राप्त होवो, अशी शुभेच्छा मंत्री पाऊसकर यांनी दिली. यावेळी त्यांच्यासमवेत सावर्डेचे सरपंच संदीप पाऊसकर, पंच अमेय नाईक, तेजा नाईक, सुनील नाईक आदी उपस्थित होते.