किरीट सोमय्या यांना जिल्हा बंदीची नोटीस
मुंबई/ प्रतिनिधी
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी १२७ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. उद्या किरीट सोमय्या कोल्हापूर दौऱ्यावर असून ते कागल येथी संताजी घोरपडे कारखान्याची पाहणी करणार आहेत. दरम्यान, किरीट सोमय्या कोल्हापूरला येण्या आधीच त्यांच्या घराबाहेर मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे सोमय्यांनी मुश्रीफांचा घोटाळा बाहेर काढल्यामुळेच माझ्या अटकेचे आदेश ठाकरे सरकारने दिले असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. हा घोटाळा दाबण्यासाठी घरातून अटक करण्याचे हे आदेश गृहमंत्र्यांकडून दिले गेल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यांच्या घराखाली मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांना नोटीस दिली आहे. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना कोल्हापूरात येण्यापासून प्रतिबंधित करणारी नोटीस दिली आहे. त्यावर त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी आरोप करताना त्यांनी म्हटलंय की, मी अजून कोल्हापूरात गेलोच नाहीये. मुश्रिफांचा घोटाळा बाहेर काढण्यासाठी मी कोल्हापूरला दौरा करणार होतो. मात्र, पवार एवढे घाबरले आहेत की, त्यांनी माझ्या अटकेचे आदेश दिले आहेत. मात्र, मी कोल्हापूर दौऱ्यावर ठाम असल्याचं त्यांनी म्हटलंय. पोलिसांची गुंडगिरी ही ठाकरे सरकारची दादागिरी आहे. पोलिसांनी आतून मला आदेश दाखवलाय की, कोल्हापूर कलेक्टरांनी हा आदेश दिलाय की, ते कोल्हापूरला येता कामा नयेत. याचसाठी गृहमंत्र्यांनी हा आदेश दिलाय की, कोल्हापूरला येऊ नयेत. कारण ते आले तर ते हा घोटाळा बाहेर काढतील आणि अनिल देशमुखांनंतर त्यांनाही चौकशीचा ससेमिरा लागून जेलमध्ये जावं लागणार.