खासदार संजय मंडलिक यांचा दावा
कोल्हापूर/प्रतिनिधी
आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर शिरोळ संस्था गटातून विजयी झाले आहेत. त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली आहे ते शिवसेना आघाडीसोबत राहतील असा दावा आघाडीचे नेते खासदार संजय मंडलिक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. परिवर्तन आघाडीचे शाहुवाडीतून रणवीर गायकवाड, प्रक्रिया गटातून बाबासाहेब पाटील असुरलेकर आणि मी स्वतः असे चार उमेदवार शिवसेना आघाडीचे आहेत. उर्वरित जागांवरही आमचे उमेदवार विजय होतील असा दावाही खासदार मंडलिक यांनी केलेला आहे. दरम्यान विजयी झाल्यानंतर मंडलिक यांनी राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि गायकवाड यांचे दूरध्वनीवरून अभिनंदनही केले आहे.