प्रतिनिधी /म्हापसा
मंत्री मायकल लोबो काँग्रेसमध्ये गेल्यास काँग्रेसच्या नेत्यांनी एकत्रित येऊन आपला पाठिंबा द्यावा. जेणेकरून त्यांना घरी पाठविणे सोपे होईल. आपचे कळंगुटचे उमेदवार सुदेश मयेकर यांचा आगामी निवडणुका 2022 च्या जाहीरनाम्याचे विमोचन कळंगूट आप कार्यालयात मान्यवरांच्याहस्ते करण्यात आल्यावर सुदेश मयेकर पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी उमेवदार सुदेश मयेकर म्हणाले की, 2017 मध्ये आमचा प्रवास सुरू झाला. 12 मॅन्टली रिटायर लोकांना घरी पाठविले आहे. जे अमली पदार्थ सेवन करीत होते त्यांना मदत केली. 2017 मध्ये आपण पंच निवडले. केअरफूल कळंगुटच्या माध्यमातून हे केले. कळंगूट ग्रोव्हींग ग्रीन याद्वारे 350 शेतकऱयांना मदत करून शेतात पाठविले. 600 कुटुंबियांना खत बियाणे, चिकण मातीचे गणपती, पंचायतीत ग्रीन इंधनद्वारे सोलर एनर्जी दिली. महिलांना गाळे दिले, पायलट टॅक्सी यांना स्टॅण्ड जागा देण्याबाबत कार्य हाती घेतले. गुरांना गोशाळेत पाठविले, कोविड काळात रक्तदान शिबिर, 1500 मोफत चष्मे, 16 क्रिकेट संघ खेळविले, आशिष मेहरा, अजय जडेजा हे प्रमुख आकर्षण ठरले. पाच हजार झाडे दिली.
आमदाराचे आपण एकेकाळचे समर्थक होते. आज त्यांच्या विरोधात का? छोटूच्या भावाचे वाईन स्टोअर आपण रिनीव केले. आज पंचायतीचा रिमोट कंट्रोल त्यांच्या हातात आहे ते चालवितात तशी पंचायत चालते. म्हणून आम्ही दिशा बदलली. कळंगूट सेव्ह होण्यासाठी मंत्री मायकलला घरी बसविणे गरजेचे आहे. आप काम घेऊन खूप पुढे गेले आहे. चांगले लोक या पक्षात आहे. डान्सबार छोटू 15 वर्षे चालवितात. वाईट गोष्टी बंद करण्यास.
मंत्री लोबोना घरी पाठविण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवारांनी एकत्र यावे
मंत्री मायकल लोबोना घरी पाठविण्यासाठी जोसेफ सिक्वेरा, ऍन्थनी मिनेझीस, आग्नेल फर्नांडिस यांनी एकत्रित येऊन आमच्याबरोबर रहावे आणि त्यांचा पराभव करण्यास हातभार लावावा असे सुदेश मयेकर म्हणाले. मंत्री लोबो काँग्रेसमध्ये गेल्यास सर्वांनी एकत्रित येऊन आपला पाठिंबा द्यावा. छोटूनी मायकल लोबोच्या आशीर्वादाने सर्व गैरकृत्ये केली वाईट टय़ुरिस्ट येण्यासाठी मंत्री लोबोच कारणीभूत आहे. आम्हाला जनतेनी संधी दिल्यास अवघ्या एका महिन्यात आम्ही कळंगूट सर्व गौरकृत्यापासून साफ करू असे सुदेश मयेकर यांनी स्पष्ट केले.