गोकुळ शिरगाव प्रतिनिधी
सांगवडेवाडी (ता. करवीर) येथील जखुबाई मंदिरात चोरी करणाऱ्या दोन आरोपींना आज गोकुळ शिरगाव पोलिसांनी अटक केली. मुख्य दरवाजाचे कुलूप अज्ञातांनी तोडून मंदिरातील अंदाजे चाळीस हजाराचे साहित्य चोरीस नेले होते.
याबाबत अधिक माहिती अशी अज्ञात चोरट्यांनी दोन दिवसापूर्वी मध्यरात्री मंदिरातील तीन पितळेच्या मोठ्या समया, इन्वर्टर बॅटरी व दोन सीसीटीव्ही कॅमेरे, कशी चोरी झाली होती, या बाबतची फिर्याद मंदिराचे पुजारी निवृत्ती गुरव रा. सांगवडे यांनी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात दिली होती. मंदिरामध्ये वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनेमुळे अलीकडेच मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. त्यामुळे या घटनेचे सी.सी.टीव्ही फुटेज वरून आरोपी निलेश नागेश मगर (वय २७) व प्रमोद विश्वास मगर (वय २५) दोघेही राहणार कणेरीवाडी ता. करवीर या आरोपींना अटक करून त्यांचे कडून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदरची कामगिरी गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांचे मार्गदर्शनाखाली एएसआय सनदी, पो. हवालदार तेलंग, पो .ना युवराज कांबळे यांनी केली.