माडग्याळ / वार्ताहर
प्रति पंढरपूर म्हणून समजल्या जाणाऱ्या गुड्डापूर (ता.जत) येथील श्री धान्नम्मादेवीचे मंदिर मार्चमध्ये लॉकडाउन झाल्यापासून भाविकांना दर्शनासाठीदेवीचे मंदिर बंदच होते .त्यामुळे भाविकांसाठी दर्शन घेणे बंदच झाले होते.दिपावलीच्या पाडव्यादिवशी शासनाच्या आदेशानुसार मंदिर खुले झाल्याने देवीचे दार उघडताच सकाळपासूनच भाविकांची श्री दान्नमा देवीच्या दर्शनासाठी गर्दी झाली होती. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान व लिंगायत समाजाचे आराध्यदैवत श्री दान्नमादेवी आहे. येथे कार्तिक आमव्यसेस मोठी यात्रा भरते कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातून हजारो भाविक पायी चालत देवीच्या दर्शनासाठी येत आसतात.
गुड्डापूर येथील श्री दान्नमादेवी नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे. येथे शकडो वर्षीपासून त्रिकाल पुजेची व पुरनपोळी नैव्वद्याची परंपरा आहे व ती आजतगायत सुरु आहे. देवस्थान कमिटीने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोफत अन्नदासोहची सोयही उपलब्ध करून दिली आहे. राज्य भरातून भाविक देवीच्या दर्शनासाठी येत आसतात. आजपर्यंत मंदिर बंद आसल्याने बाहेरील लोकांचा ओघ थाबला होता.त्याचा फटका इथल्या स्थानिक विक्रेत्यांना बसला होता.आता मंदिर खुले झाल्याने भाविकांसह छोटे,मोठे व्यावसायिक देखील समाधान व्यक्त करत आहेत.देवस्थान कमिटिकडून भाविकांच्या सुरक्षेच्या द्रष्टीने सर्व मंदिर परिसरात स्वच्छाता मोहीम राबवून संपूर्ण मंदिर परिसरात सॉनिटायझर फवारणी करणयात आलीआहे.पुरेशी खबरदारी घेवूध व सोशलडिशट्नस ठेवूनच लोकांना मंदिरात प्रवेश दिला जात आहे.भाविकांनी मंदिर परिसरात विनाकारण गर्दी करू नये आसे आवहान देवस्थान कमिटी कडून करण्यात आले आहे.