आमदार सुदिन ढवळीकर यांची प्रतिक्रिया : उपनगराध्यक्षांचे अभिनंदन
वार्ताहर/ मडकई
मगो पक्षांने नेहमीच सत्याची कास धरली आहे. लोकशाहीची तत्वे व नैतिक मुल्ये पाळल्याने जनमानसात मगोला स्थान आहे. मगोच्या कार्यपद्धतीमुळे फोंडा पालिकेवर अमिना नाईक यांची उपनगराध्यक्षपदी बहुमताने निवड झाली, अशी प्रतिक्रिया मगो नेते व मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केली.
उपनगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अमिना नाईक यांनी आमदार ढवळीकर यांची भेट घेतली. त्यांचे अभिनंदन करताना ढवळीकर यांनी वरील प्रतिक्रिया दिली. यावेळी मगोचे फोंडय़ातील नेते डॉ. केतन भाटीकर, क्रियेश नाईक हे उपस्थित होते. फोंडय़ातील नागरिकांना चांगली सेवा द्या, पक्षातर्फे आपले नेहमीच सहकार्य असेल, असे ढवळीकर म्हणाले. मगोच्या हितार्थ ज्या नगरसेवकांनी अमिना नाईक यांच्या विजयाला हातभार लावला, त्यांचे ऋण व्यक्त करुन फोंडय़ात जनसेवा करताना डॉ. भाटीकर हे कुठलाच भेदभाव करीत नसल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. केतन भाटीकर म्हणाले, येणाऱया काळात गोव्यातील जनता मगो पक्षाला पुर्नवैभव प्राप्त करुन देईल. सुदिन ढवळीकर व पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांच्या नेतृत्त्वाखाली मगोचे जुने दिवस परत येतील. निस्वार्थी वृत्तीने पक्षासाठी काम करणाऱयांची पक्ष व जनता नेहमीच दखल घेत असते, असा विश्वास विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्वागत साई नाईक यांनी तर मिलिंद सावईकर आभार मानले.