दीपक ढवळीकर अध्य़क्ष असेपर्यंत पक्ष भरारी घेणे अशक्य
प्रतिनिधी / फेडा
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या (मगो) केंद्रीय समितीच्या निवडीसाठी शनिवार 16 जाने. रोजी होऊ घातलेल्या निवडणूकीत अध्यक्ष दीपक ढवळीकर यांचा पाडाव करून Zsत्याजागी निलेश पटेकर या युवा उमेदवाराला निवडून द्या असे आवाहन फोंडय़ाचे माजी आमदार तथा मगो केद्रीय समितीचे माजी सदस्य लवू मामलेदार यांनी फोंडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केले.
यावेळी मगोच्या केंद्रीय समितीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेले उमेदवार निलेश पटेकर, किशोर परवार उपस्थित होते. मराठा सभागृह पणजी येथे उद्या 16 जाने. रोजी मगो पक्षाच्या केदीय समिती कार्यकारिणीच्या 14 जागासांठी सदर निवडणूक होणार आहे. दिपक ढवळीकर यांच्या कार्यकाळात मगो पक्षाची वाटचाल फक्त फोंडा तालुक्यापुरती मर्यादीत राहिलेली आहे. मगो पक्षाचा राज्यभर विस्तार करण्यासाठी ढवळीकरांच्या तावडीतून पक्ष सोडविणे गरजेचे असल्याचे लवू मामलेदार म्हणाले. गजानन तिळू नाईक यानाही अध्यक्षपदापासून वंचित ठेवलेले आहे, खजिनदारपदी आपा तेली यानाही हीच वागणूक दिलेली असून बहुजन समाजावर होणाऱया अन्यायाला वाचा फोडण्य़ासाठी यावेळी दिपक ढवळीकर यांचा पाडाव करा असे आवाहन लवू मामलेदार यांनी केले आहे.
दिपक ढवळीकर अध्य़क्ष असेपर्यंत पक्ष भरारी घेणे अशक्य
सद्यपरिस्थिती मगो पक्षाची वाटचाल पाहता मगो फक्त फोंडय़ापर्यंत मर्यादीत राहण्यासाठी ईच्छूक असल्याचे चित्र दिसते. राज्यभरातून फक्त प्रियोळ व मडकई येथील जिल्हा पंचायत सदस्य व पंचसदस्यांना सामावून घेण्यात आलेले आहे. हे चित्र पाहता पक्षाला फोंडयाहून दुसरीकडे लक्ष देण्यात स्वारस्य नसल्याचे दिसून येते. पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या केशोर परवार यांच्यावर दिपक ढवळीकर यांनी कायम अन्याय केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. दिपक ढवळीकर यांनी सदर निवडणूक सहज जिंकता यावी यासाठी आपल्या मर्जीतील लोकांनाच सदस्यपदी पक्षप्रवेश दिलेला आहे. 700 असलेली सदस्य संख्या 999 पर्यत पोचविताना आपल्या मर्जीतील लोकांना प्रवेश देऊन फुगविण्यात आलेला आहे. ज्यांना पक्षात प्रवेश घेऊन अजून 90 दिवसही पुर्ण झालेले नाही. यापुर्वी 2017 साली नारायण सावंत हे अध्यक्षपदी लायक चेहरे असतानाही त्य़ांना डावलून अध्यक्षपदी आपलीच मक्तेदारी रहावी असा दिपक ढवळीकर यांचे राजकरण राहिलेले आहे. त्यामुळेच मगो पक्षाची वाढ खुंटलेली असल्याचे निलेश पटेकार यांनी माहिती दिली. केंद्रीय समितीच्या निवडणूकीत निलेश पटेकार यांच्यासह किशोर परवार, प्रभाकर मुलीक, चंद्रशेखर खडपकर यांनी अर्ज दाखल केलेला आहे. विधानसभेच्या रिक्त होणाऱया आमदारीला इतरांना संधी न देता प्रत्येक निवडणूकीत स्वतः उतरण्याची वृत्ती असलेले दीपक ढवळीकर हे नेते आहेत. पक्षाच्या केंद्रीय समितीच्या निवडणूकीत दिपक ढवळीकर यांना मतदान न करता अध्यक्षपदापासून दूर ठेवा त्याऐवजी इतर कुणालाही मतदार करा, असे आवाहन मगो पक्षाच्या प्रत्येक सदस्याला लवू मामलेदार यांनी केले आहे.