कोणत्याही कार्यक्रमाला रंगत आणताना निवेदनाचे कौशल्यही महत्त्वाचे असते. त्यामुळेच रिऍलिटी शोच्या निवेदनाची धुरा सांभाळत असताना त्या कार्यक्रमातील उत्साह सळसळता ठेवावा लागतो. पण यावरूनच अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिला नेटकऱयांकडून ट्रोल व्हावे लागले होते. सध्या ती एका लहान मुलांच्या गाण्याच्या रिऍलिटी शोचे निवेदन करत आहे. खेळण्या-बागडण्याच्या वयाची ही मुलं अशी काही गाणी गात असतात की त्यांची गाणी आणि तयारी बघून कुणीही अवाप् होईल. या कार्यक्रमाचे निवेदन करताना मुलांना चिअरअप करावं लागते तेव्हा मृण्मयी गाण्यावर दाद देण्यासाठी वा वा असं म्हणत ओरडते. तिच्या या चिअरअपवरून नेटकऱयांनी मृण्मयीने ओव्हरऍक्टींग करू नये असं म्हणत इन्स्टावर ट्रोल केलं. मुळातच या रिऍलिटी शोचे परीक्षकही ट्रोल झाले होते, त्यात मृण्मयीलाही कमेंटमधून नेटकऱयांनी ट्रोलिंग केलं. पण या ट्रोलिंगला उत्तर देताना मृण्मयीने सोशल मीडियावर प्रेक्षकांना सुनावलं. ती म्हणाली, ही मुलं आठ दहा वर्षाची आहेत. एकेका गाण्यासाठी त्यांनी केलेले तयारी व मेहनत खूप मोठी आहे. मग त्यांनी गाणे म्हटल्यावर काय हाताची घडी घालून बसायचे का? प्रेक्षक म्हणून या मुलांचे गाणे ऐकून तुम्ही शांत राहू शकत असाल, पण मी नाही. शेवटी ती मुलेच आहेत. भलेही याला ओव्हरऍक्टींग म्हणा, पण कलेला दाद देणे काय असते हे एक कलाकारच समजू शकतो.
Previous Articleबँक ऑफ इंडियाने घटवले व्याजदर
Next Article भिकाऱ्यांचे भाग्य बदलणारा दाता
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.