वार्ताहर / किणये
शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मच्छे येथील लक्ष्मी महादेव सुळगेकर यांचे राहते घर कोसळून सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले. शनिवारी दुपारी घराची भिंत कोसळली असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे.
लोहार गल्ली, मच्छे येथे लक्ष्मी महादेव सुळगेकर राहतात. त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. अशातच असलेला निवाराही कोसळल्यामुळे त्या हतबल झाल्या आहेत. शनिवारी तालुक्मयात वळिवाचा जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे सुळगेकर यांचे घर कोसळले. गावातील ग्राम पंचायतच्या काही माजी सदस्यांनी सुळगेकर यांच्या घरी भेट दिली. या महिलेला प्रशासनामार्फत मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.