वार्ताहर / किणये
मच्छे येथील नवभारत मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीची 12 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी व्ही. एस. पाटील हायस्कूल मच्छे येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन संजय सुळगेकर होते.
स्वागतगीत मच्छे प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनींनी म्हटले. अभियंता प्रकाश चिकदिनकोप व कायदे सल्लागार ऍड. ए. बी. पाटील यांची संस्थेच्या कार्याबद्दल समाधानकारक भाषणे झाली.
सभासदांना 12 टक्के लाभांश
संस्थेला सन 2019-20 या आर्थिक वर्षात 7 लाख 46 हजार 661 रुपयांचा नफा झाला असून सभासदांना 12 टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची माहिती चेअरमन संजय सुळगेकर यांनी दिली. तसेच सोसायटीमार्फत अनेक गरजू लोकांना अर्थसाहाय्य करून त्यांचे छोटे-मोठे उद्योग सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. संस्था ग्रामीण भागातील सर्वसामान्यांसाठी कार्य करीत असल्याचे मनोगत सुरेश लाड यांनी व्यक्त केले.
सभेमध्ये ताळेबंद पत्रकाचे वाचन जनरल मॅनेजर संजीव हालगी यांनी केले. नफा-तोटा पत्रकाचे वाचन नेहा लाड यांनी केले. तसेच मिळालेल्या नफ्याच्या विभागणी पत्रकाचे वाचन महेश घाडी व अंदाजपत्रक प्रियांका गुरव यांनी सादर केले. सभेला संजीव मजुकर, मालोजी लाड, भुजंग लाड, सावंत पाटील, रेणुका लाड, प्रिया सुळगेकर, शरद बलोगी, राजू तळवार, मिना लोहार, अनंत लोहार आदींसह सभासद उपस्थित होते. प्रारंभी दिवंगत सुरेश अंगडी, कोरोना महामारीच्या संकटामुळे निधन झालेले नागरिक, देशसेवा बजावत असताना शहीद झालेले वीर जवान, समाजातील निधन झालेले मान्यवर मंडळी, सभासद या सर्वांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. सूत्रसंचालन एम. पी. लाड यांनी केले. एस. पी. लाड यांनी आभार मानले.