गावांतील प्रमुख देवदेवतांचे पंचमंडळींच्या हस्ते पूजन : पारंपरिक वाद्यांच्या गजरात होळी उभारणी
वार्ताहर / किणये
मच्छे, पिरनवाडीसह तालुक्मयाच्या काही भागात सोमवारी रंगपंचमी साधेपणाने साजरी करण्यात आली. सण, उत्सव यावर प्रशासनाने काही नियमावली लागू केली आहे. प्रशासनाच्या नियमांचे पालन करीत सोमवारी काही ठिकाणी रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. पारंपरिक वाद्यांसह डॉल्बीच्या तालावर काही तरुण थिरकताना दिसून आले.
सोमवारी सकाळपासूनच तरुणांनी व मुलीनी रंग खेळण्यास प्रारंभ केला. गावातील प्रमुख पंचमंडळीने देवदेवतांची पूजा अर्चा केल्यानंतर रंगोत्सव सुरू झाला. कोरोना महामारीमुळे परंपरेत खंड पडू नये म्हणून काही गावांमध्ये अगदीच नेमक्मया तरुणांनी रंगपंचमी साजरी
केली.
पिरनवाडी, मच्छे, मंडोळी, हंगरगा, आंबेवाडी, हिंडलगा, खणगाव खुर्द आदेंसह काही गावांमध्ये सोमवारी रंगोत्सव साजरा करण्यात आला. तसेच तालुक्मयाच्या काही गावांमध्ये पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी करण्यात येणार आहे. रविवारी सायंकाळपासून तालुक्मयात होलिकोत्सवाला प्रारंभ झाला आहे.
रविवारी रात्री विविध प्रकारच्या झाडांची लाकडे, फांद्या, गोवऱया, जमा करून होळीचे दहन करण्यात आले. त्यानंतर होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. ग्रामीण भागात काही ठिकाणी वेगवेगळय़ा प्रकारच्या लाकडाची होळी उभारण्याची परंपराही कायम आहे. रविवारी रात्री तर काही ठिकाणी सोमवारी सकाळी हालगीसह पारंपरिक वाद्यांच्या गजरात होळी उभारण्यात आली.
पाच दिवस ग्रामीण भागात होळीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. पौराणिक व धार्मिक नाटय़प्रयोगाचेही सादरीकरण या शिमग्याच्या निमित्ताने करण्यात येते.