वार्ताहर /किणये :
मच्छे येथील ब्रम्हलिंग महाप्रसाद कमिटीतर्फे श्रावण महिन्याच्या चौथ्या श्रावण सोमवारी करण्यात येणारा महाप्रसाद यंदा कोरोनामुळे रद्द करण्यात आला आहे. कमिटीच्या सदस्यांची नुकतीच बैठक झाली असून या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाप्रसाद कमिटीचे अध्यक्ष सुरेश लाड होते. दरवषी श्रावण मासनिमित्त ब्रम्हलिंग मंदिर परिसरात चौथ्या श्रावण सोमवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमाला सुमारे 7 ते 8 हजार भाविकांची गर्दी होत असते.
प्रशासनाच्या आदेशानुसार गर्दी टाळण्यासाठी व कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून यंदाचा दि. 17 ऑगस्ट रोजी होणारा महाप्रसाद रद्द करण्यात आला आहे.
बैठकीला अण्णू पाटील, संजय सुळगेकर, राजू नावगेकर, रमेश कऱयाण्णवर, असद हुजदार, शरद बल्लोगी, मीना लोहार, रेणुका लाड, संभाजी अनगोळकर आदी उपस्थित होते.