प्रतिनिधी /बेळगाव
धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धी योजना, धर्मस्थळ समुदाय व अभिवृद्धी विभागातर्फे मच्छे येथील माजी सैनिक सेवा संघाला 2 लाख रुपयाची देणगी देण्यात आली. धर्मस्थळचे जिल्हा संचालक प्रदीप, तालुका योजना अधिकारी नागराज, मच्छे विभागप्रमुख गंगा व इतर संचालकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
प्रारंभी सेवा संघाचे सेपेटरी सुरेश सडेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. जिल्हा संचालक प्रदीप यांनी धर्मस्थळच्या उपक्रमांविषयी माहिती दिली. संघाचे अध्यक्ष पुंडलिक बाळेकुंद्री यांनी धर्मस्थळचे आभार मानले. यावेळी माजी सैनिक सेवा संघाचे सदस्य व धर्मस्थळचे पदाधिकारी उपस्थित होते.