विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जागा अपुरी पडत असल्याने सभामंडप बांधण्याचा निर्णय
प्रतिनिधी / बेळगाव
मजगाव येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोरील सभामंडपाची पायाखोदाई कार्यक्रम रविवार दि. 4 रोजी थाटात झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टचे सदस्य एकनाथ चौगुले होते.
यावेळी श्री कलमेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष बी. डी. कुडची व सदस्य शिवाजी पट्टण यांच्या हस्ते पायाखोदाईचा शुभारंभ करण्यात आला. बी. डी. कुडची यांनी भूमिपूजन केले. शिवाजी पट्टण यांनी कुदळ मारून पायाखोदाईचा शुभारंभ केला.
यावेळी कलमेश्वर देवस्थान कमिटीच्या सर्व सदस्यांचा गुलाबपुष्प व टोपी देऊन सत्कार केला.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भाविकांना जागा अपुरी होत असल्याने मंदिराच्या ट्रस्टींनी मंदिराला लागूनच प्रशस्त सभामंडप उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी लाखो रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सभामंडपासाठी उत्स्फूर्त देणग्या जाहीर केल्या.
बी. डी. कुडची, शिवाजी पट्टण, श्रीपाल पुजारी, सुरेश मजुकर, राजू सातेरी, कृष्णा मजुकर, अशोक पुजारी, मनोहर सातेरी, नारायण काकतकर, गजू मोर्डेकर, चंद्रकांत मजुकर, दौलत पाळेकर, संजू मजुकर, अशोक मजुकर, पुन्नाप्पा ढोणजी, विलास मजुकर, संदीप नरसगौडा, निलकंठ सुतार, दिनेश धामणेकर, तुकाराम मजुकर, सचिन वाडेकर, राजू मजुकर, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पौराहित कार्य ह. भ. प. यल्लाप्पा चौगुले महाराज यांनी पार पाडले.