प्रतिनिधी /बेळगाव
मजगाव क्रॉसजवळ असलेल्या एका हॉटेलवर छापा टाकून सीईएन विभागाच्या अधिकाऱयांनी 3 हजार रुपये किमतीची बेकायदा दारू जप्त केली आहे. या प्रकरणी दोघा जणांवर एफआयआर दाखल करण्यात आले आहे.
अभिजीत व्हेज अँड नॉनव्हेज या हॉटेलवर छापा टाकून दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पुंडलिक मल्लाप्पा तळवार (वय 48) रा. मजगाव, अरुण प्रभाकर दानप्पन्नवर (वय 24) रा. गुरुवार पेठ, कित्तूर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी एकूण 33.75 लीटर दारूसाठा जप्त केला असून अधिक तपास सुरू आहे.